अलिशान मोटारीतून दारु वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

फुरसुंगीत अलिशान मोटारीतून गावठी दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना खंडणी व अमंली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 95 हजार रुपयांची 420 लीटर दारु जप्त करण्यात आली.

अनिकेत रवींद्र कुंभार (वय 24), आणि राकेश रतन कुंभार  (वय 40, दोघेही रा. संभाजी नगर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खंडणी व अमंली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुâरसुंगी परिसरात अलिशान मोटारीतून गावठी दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उदय काळभोर, मनोज शिंदे, मंगेश पवार, रमेश गरुड, अमोल पिलाणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोटारीचा पाठलाग केला. त्यानंतर काही अंतरावर अनिकेत अणि राकेशला ताब्यात घेतले. त्यांच्या मोटारीची पाहणी केली असता, त्यामध्ये प्रत्येकी 35 लीटर भरलेले दारुचे 12 कॅन आढळून आले. दोघांना हडपसर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या