Live – विरोधकांवर मोदींचे शरसंधान, 370 हटवण्यास विरोध करणाऱ्यांना लोक उत्तर देतील

2721
modi-oath

#MahaElection 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराने जोर पकडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी तीन सभा होणार आहेत. परळी येथे पहिली सभा होणार असून येथे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा ते प्रचार करत आहेत.

परळीतील सभेचे Live Updates – 

 • सुट्टी घेऊ नका मतदान करा
 • दिवाळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र साजरी करतो, तसा हा देशाचा लोकशाहीचा उत्सव आहे
 • आम्ही काम करत आहोत, आता तुमचेही कर्तव्य आहे मतदान करण्याचे
 • ऊसतोड मजुरांच्या मुलाबाळांसाठी महामंडळ उभे केले, त्यांचे प्रश्न सोडवले जात आहेत
 • त्यामुळे आता देशात ठिकठिकाणी सोयीसुविधांसाठी विविध कामे सुरू आहेत
 • हे पैसे मोदींचे नाही, ते तुमचेच पैसे आहेत आधीचे लोक तुमचे पैसे चोरत होते, ते मोदींनी रोखले
 • अनेकांना प्रश्न की सरकार तर आधी होते मग काम का होत नव्हते, आता मोदी पैसे कुठून आणतात
 • देशाच्या हक्काचा पैसा आम्ही वाचवला
 • आधी पैसे पोहोचवताना दलाल ‘कट’ लावायचे, मात्र आम्ही दलाली नष्ट केली, थेट बँक खात्यांमध्ये पैसे पोहोचवले
 • शेतमजूर, रस्तेकाम करणारे मजूर, घरकाम करणाऱ्यांना 3 हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन मिळेल
 • पुढल्या काही महिन्यांत ही रक्कम जमा होईल
 • संपूर्ण महाराष्ट्रात 2 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत
 • मराठवाड्यातून आम्ही दुष्काळ नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहोत
 • गोदावरी जलयुक्त करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे
 • महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने जलसिंचनासाठी काम कले, जलयुक्त शिवार केले
 • पाण्यासाठी इतका प्रयत्न देशातच काय जगभरात अन्य कुठेही झाला नसेल
 • प्रत्येकाला स्वच्छ पाणी हा आमचा संकल्प आहे, त्यासाठी आम्ही जलजीवन मिशन चालवत आहोत
 • प्रत्येकाला घर मिळावं यासाठी आम्ही काम करत आहोत
 • आता संधी आली आहे, विरोधकांना धडा शिकवा
 • या विरोधकांची विधानांची एक यादी आहे, ही विधानं जनतेने ऐकली आहेत त्यामुळे ते त्यांना धडा शिकवतील
 • विरोधक म्हणतात की आपण कश्मीर घालवला, तुम्हाला असं वाटतं की कश्मीर आपण घालवलं? अजिबात नाही
 • काँग्रेसचा एक नेता तर म्हणे हा देशाचा अंतर्गत मुद्दा नाही, त्याला तुम्ही माफ करणार का?
 • मात्र हे लोक हिंदुस्थान विरोधी भूमिका घेणाऱ्यांना मदत करत होते
 • आमचे विरोधक हे आमच्या या निर्णयाचा विरोध करतात, लोकशाही नष्ट झाल्याचे आरोप करतात
 • आम्ही कलम 370 हटवलं त्याला ज्यांनी विरोध केला त्यांना जनता साथ देणार नाही
 • आमची कार्यशक्ती आणि विरोधकांची स्वार्थशक्ती यांच्यात ही लढाई आहे
 • आमच्या महायुतीच्या 5 वर्षांच्या कामांमुळे जनशक्ती आमच्याकडे आहे
 • विरोधक, जे लोक थकले आहेत ते तुमचं काम करू शकतील का? मग त्यांना का मत द्यायंच?
 • तरुणांनी भरलेली एक मजबूत टीम महायुतीकडे आहे
 • विरोधकांकडून लोक आता भाजपकडे येत आहेत
 • हे पाहून विरोधकांना घाम फुटला असेल, धाप लागत असेल
 • हा जनसागर आहे, इथे मैदान छोटं पडलं आहे
 • यंदा तर इथे रेकॉर्ड ब्रेक असा विजय होईल
 • बीडचा आशीर्वाद नेहमी भाजपला राहिला
 • इथे नेहमीच कमळ फुलले आहे
 • गोपीनाथजी जिथे असतील तिथून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा यांना आशीर्वाद देत असतील
 • मराठीतून भाषणातून सुरुवात
 • पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात
 • पंतप्रधान मोदींनी परळी वैद्यनाथाचे दर्शन घेतले
 • नरेंद्र मोदी परळीत पोहोचले
 • परळीतील महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांची प्रचारसभा
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज परळीत सभा
आपली प्रतिक्रिया द्या