
‘मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हा आवाज आज मुंबईच्या आसमंतात घुमणार आहे. हिंदी सक्तीवर मराठी शक्तीच्या विजयाचा अभूतपूर्व विजयोत्सव वरळीच्या एनएससीआय डोम येथे होत असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माय मराठीचे हजारो वारकरी वाजतगाजत, गुलाल उधळत, विजय पताका फडकावत मुंबईत दाखल होत आहेत. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार घुमणार असून मराठीच्या भक्कम एकजुटीसाठी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत असल्याने अवघ्या देशाचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे.
-
-
-
-
- जय श्रीराम आम्ही म्हणतोच पण त्याआधीही राम राम म्हणणारे आम्हीच
- आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही, पण आमचे मारुती स्तोत्र का संपवता?
- मराठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी उभं राहणारच
- मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी उभं राहायचं आहे
-
मुंबईच्या चिंधड्या उडवल्या जात आहे
-
का तुम्ही आमची मराठी मारता, आमच्यावर सक्ती करता! आमच्यावर सक्ती केली तर शक्ती दाखवू!
-
इकडे घाण आणि इकडे घाणा!
-
नुसते पालख्यांचे भोई होणार की माय मराठीला पालखी मध्ये बसवणार?
-
म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचाच नाही तर महाराष्ट्राचा आहे
आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी – उद्धव ठाकरे@ShivSenaUBT_ pic.twitter.com/EKSFKFj8y3
— Saamana Online (@SaamanaOnline) July 5, 2025
-
दिल्लीत बसलेल्या मालकांचे बूट चाटण्यासाठी आमचं सरकार पाडलं
-
2014 पासून तुम्ही मुंबईचे लचके तोडले, आर्थिक खच्चिकरण केलं, उद्योग पळवले
-
मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली आणि करणारच…
-
आता एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी
-
आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची त्यांच्याकडून अपेक्षा नाहीय.
-
बऱ्याच वर्षानंतर राज व माझी भेट व्यासपीठावर झाली.
-
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
-
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेनं पाहायचं नाही! राज ठाकरेंचा खणखणीत इशारा pic.twitter.com/AEUQi2FPFy
— Saamana Online (@SaamanaOnline) July 5, 2025
-
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले पण त्यांचे मराठीवर आक्षेप घेऊ शकता का?
-
मंत्र्यांची हिंदी ऐका फेफरं येईल – राज ठाकरे
-
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
-
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेनं पाहायचं नाही – राज ठाकरे
-
राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
-
वरळी डोमबाहेरही मराठी प्रेमींची खचाखच गर्दी
वरळी डोमबाहेरही मराठी प्रेमींची खचाखच गर्दी#UddhavThackeray #RajThackeray pic.twitter.com/e2lgMurS6Z
— Saamana Online (@SaamanaOnline) July 5, 2025
- राज्यगीताला सुरुवात
- राज ठाकरे विजयी मेळाव्यास्थळी दाखल
- कट्टर शिवसैनिक असलेला समर्थ दिनेश आदावडे हा चार वर्षांचा चिमुकला विरारवरून मेळाव्याला आला आहे. एक वर्षांचा असल्यापासून तो वडिलांसोबत शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्याला जातो. त्याची सायकल भगवी असून त्यावर शिवसेनेची मशाल आणि भगवा झेंडा आहे.
होय मी मराठी माणूस! ठाकरे हे नाव नाही तर आधुनिक महाराष्ट्राचा ब्रँड आहे!! #UddhavThackeray #RajThackeray pic.twitter.com/jdVv5Sfstn
— Saamana Online (@SaamanaOnline) July 5, 2025
- उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे मेळाव्यास्थळी दाखल
- उद्धव ठाकरे व राज ठाकरे मेळाव्यासाठी रवाना
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे व आमदार जितेंद्र आव्हाड मेळाव्यास्थळी दाखल
- एनएससीआय डोमबाहेर जमलेल्या मराठी प्रेमींनाही कार्यक्रम पाहता यावा यासाठी मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत.
-
-
एनएससीआय डोमबाहेर जमलेल्या मराठी प्रेमींनाही कार्यक्रम पाहता यावा यासाठी मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. pic.twitter.com/jivOWUXDLN
— Saamana Online (@SaamanaOnline) July 5, 2025
-
-
-
भगवे फेटे व हातात विजयाची गुढी घेऊन मराठी प्रेमी एनएससीआय डोममध्ये दाखल
भगवे फेटे व हातात विजयाची गुढी घेऊन मराठी प्रेमी एनएससीआय डोममध्ये दाखल #UddhavThackeray #RajThackeray pic.twitter.com/ijKmVhh9WG
— Saamana Online (@SaamanaOnline) July 5, 2025
- वाजत गाजत गुलाल उधळत मराठी प्रेमी डोममध्ये दाखल
- Photo – वरळीतील एनएससीआय डोम खचाखच भरले, मराठीप्रेमींची तुफान गर्दी
-
-
Photo – वरळीतील एनएससीआय डोम खचाखच भरले, मराठीप्रेमींची तुफान गर्दी pic.twitter.com/oOKZiUj21m
— Saamana Online (@SaamanaOnline) July 5, 2025
-
-
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत मेळाव्यास्थळी दाखल
- एनएससीआय डोमबाहेर मराठीप्रेमींची तुफान गर्दी
- एनएससीआय डोमममधील मेळाव्याची तयारी पूर्ण
-
Photo – मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी वरळी सज्ज, मेळाव्यास्थळी तयारी पूर्णhttps://t.co/ecuhcjrJGg
— Saamana Online (@SaamanaOnline) July 5, 2025
-
- वरळीतील एनएससीआय डोममध्ये महाराष्ट्रातून आलेल्या माय मराठीच्या वारकऱ्यांची गर्दी