रुग्णांना झळ बसणार! कर्करोगावरील उपचार महागणार!! कॅन्सरच्या औषधांमध्ये कंपन्या 50 टक्के वाढ करण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागाईमुळे आधीच त्रासलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसणार आहे. स्थानिक औषध उत्पादकांनी कॅन्सरच्या औषधांमध्ये 50 टक्के वाढ करण्याची मागणी केल्यामुळे कर्करोगावरील उपचार महाग होण्याची शक्यता आहे. जर ही मागणी मान्य झाली तर कॅन्सरग्रस्त रुग्णांना औषधांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील. कॅन्सरची औषधे कार्बोप्लाटिन, ऑक्सालिप्लाटिन आणि सिस्प्लाटिनचे प्रोडक्शन तोटय़ात सुरू आहेत. यामुळे या औषधांच्या किमतीत वाढ करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

औषध उत्पादकांनी कॅन्सरच्या औषधांच्या किमती वाढवण्यासाठी नॅशनल फार्मास्युटिकल अथॉरिटीशी संपर्क करत या औषधांच्या किमतीत 50 टक्के वाढ करावी, अशी मागणी केली आहे. सध्या कार्बोप्लाटिनची किंमत 61.10 रुपये प्रति 10 एमजी आहे. सिस्प्लाटिन औषधांची किंमत 70 ते 300 रुपये आहे. सिप्ला, इंटास, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, जाइडस लाइफसाइंसेज, एमक्योर, फ्रेसेनियस आणि हेटेरो या कंपन्या औषध बनवणाऱ्या स्थानिक कंपन्या सर्वात पुढे आहेत. मागील सहा महिन्यांत जियो पॉलिटिकल अनिश्चिततेमुळे प्लॅटिनमच्या किमतीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. प्लॅटिनम औषधे डोकेदुखी, मानदुखी, स्तन आणि पोटातील आतडय़ाच्या कॅन्सरसह अनेक कॅन्सरसाठी उपयोगी आहे. सिस्प्लाटिन आणि कार्बोप्लाटिनसारखे प्लॅटिनम औषधे उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त व सहज मिळणाऱ्या कीमोथेरेपी औषधांपैकी एक आहेत, परंतु आता या किमती वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. एकीकडे प्लॅटिनम औषधे अँडबॉडी ड्रग्ज का@न्जुगेट्स किंवा इन्यूनोथेरेपीच्या तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना यात नफा मिळणे मुश्कील झाले आहे. यात सरकारने हस्तक्षेप करणे खूपच गरजेचे आहे, असे एका कंपनीच्या उपाध्यक्षाने सांगितले.

110 कोटींचा बाजार

कार्बोप्लॅटिनला इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडून अधिसूचित कॅन्सर उपचार प्रोटोका@लमध्ये ग्लोबल लेवलमध्ये औषध म्हणून मान्यता आहे. या औषधाला नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया 2021 मध्ये लिस्ट करण्यात आले आहे. फार्माट्रकच्या आकडेवारीनुसार, प्लॅटिनम बेस्ट औषधांचा बाजार आता 110 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ज्यात दरवर्षी 14 टक्के वाढ होत आहे.