लोकलचे दार पूर्ण उघडणार; पूर्ण वेळ प्रवासाचा निर्णय 15 दिवसांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात असून येत्या 15 दिवसांत अशीच स्थिती राहिली तर सर्वसामान्य आणि नोकरदारांसाठी पूर्णवेळ लोकल सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

तब्बल 11 महिन्यानंतर सुरू झालेल्या या सेवेत सर्वसामान्यांना वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. काही वेळा प्रवासी निर्धारित वेळेत प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना खासगी तसेच सार्वजनिक वाहनांनी प्रवास करावा लागतो.