संचारबंदीची ऐशी तैशी, 37 लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू असतानाही अनेकजण गाडय़ा घेऊन फिरत आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात 22 मार्चपासून 10 एप्रिलपर्यंत 10 हजार 895 वाहनांवर कारवाई करून तब्बल 37 लाख 62 हजार 200 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.लॉकडाऊन असतानाही अनेकजण घराबाहेर पड़त असल्याचे आढळून येत आहे.

रत्नागिरीत संचारबंदी लागू आहे.दुचाकी वाहनांवर बंदी घातलेली असतानाही मोठय़ा प्रमाणात दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करत आहेत.22 मार्च रोजी जनता कर्फ़्यू पासून रस्त्यांवर वाहने घेऊन फिरणाऱयांवर रत्नागिरी वाहतूक पोलीस कारवाई करत आहे.गेल्या वीस दिवसात हॅल्मेट शिवाय फिरणाऱया 4924 जणांकडून 24 लाख 62 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कागदपत्रे नसलेल्या 2146 जणांवर कारवाई करून 4 लाख 29 हजार 200 दंड वसूल करण्यात आला आहे. सीटबेल्ट न लावणाऱया 441 जणांकडून 88 हजार 200 रूपये दंड वसूल करण्यात आला. वाहन परवाना नसलेल्या 157 जणांकडून 78 हजार 500 रूपये, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या 247 जणांकडून 54 हजार 200 रूपये दंड,वीमा नसलेल्या 23 जणांकडून 30 हजार 700 रूपये दंड आणि इतर कारवाईतून 2595 जणांकडून 5 लाख 36 हजार 600 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.