
माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना 50 लाखांचे विमासंरक्षण देण्यात यावे अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार मंगवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नोंदणीकृत सुरक्षका रक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्यात आला आहे. यामुळे त्यांना 50 लाखांचे विमासंरक्षण तसेच अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱयांना असलेली रेल्वे प्रवासाची परवानगीही देण्यात आली आहे.
माथाडी कामगार व सुरक्षारक्षकांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्याबाबतचा प्रस्ताक कामगार विभागाने राज्य शासनाकडे सादर केला होता. त्या प्रस्ताकावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात आला. कामगार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक आणि माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगार या दोन अत्याकश्यक सेवा देणाऱया घटकांना वित्त विभागाच्या दि.29 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट वरुन सुधारित शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिल्या. यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे करिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
1 लाखांहून अधिक कामगारांना लाभ
‘महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 ’ अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमामधील तरतूदीनुसार राज्यामध्ये 36 माथाडी मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या नोंदणीवृत्कामगारांना हा निर्णय लागू होणार आहे. माथाडी मंडळांमधील नोंदीत कार्यरत माथाडी कामगारांची संख्या 1 लाखांहून अधिक असून सद्यःस्थितीमध्ये शासकीय धान्य गोदाम, कृषी उत्पन्न बाजार समिती, घरगुती गॅस प्रकल्प अत्यावश्यक सेवेतील खाजगी कंपन्या आदी ठिकाणी 28 हजारांहून अधिक माथाडी कामगार कार्यरत आहेत.
z राज्यात 15 सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंडळामधील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक हे विविध शासकीय, निमशासकीय, सिव्हील हॉस्पिटल, शासकीय आस्थापना शासकीय मंडळे, महामंडळे, महानगरपालिका, स्थानिक स्कराज्य संस्था, सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आदी ठिकाणांसह इतर आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांची कामे करत आहेत. केंद्र शासनाने 23 मार्च 2020 रोजीच्या परिपत्रकानुसार ‘सुरक्षा रक्षकांची सेवा’ ही अत्यावश्यक सेवा जाहीर करून या सेवा लॉकडाऊनमध्ये सुरू ठेवलेल्या आहेत.



























































