जालन्यातील पाचनवडगावात हातभट्ट्या उद्ध्वस्त, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

247

जालना तालुक्यातील पाचनवडगाव येथे दारुबंदी पथकाने छापे मारुन तीन ठिकाणी गावठी हातभट्टया उद्ध्वस्त करुन 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर याप्रकरणी तीन जणांविरुध्द तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना तालुक्यातील पाचनवडगावात दारुबंदी पथकाने छापा मारुन हातभट्टी चालक आरोपी मिराबाई शरद सोनवने, लक्ष्मीबाई रजीत गायकवाड,रुखमनबाई कोडीराम गायकवाड सर्व रा.पाचनवडगाव यांच्या ताब्यातुन 52 हजार 500 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. याप्रकरणी दारुबंदी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन तालुका जालना पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या