लॉक डाऊनचा गैरफायदा, शौचालयाच्या टाकीवर जुगाराचा डाव मांडणाऱ्या 17 तरुणांना अटक

312

लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन सोशल डिस्टन्सिंगची ऐंशी तैशी करत शौचालयाच्या टाकीवर जुगाराचा डाव मांडणाऱ्या तब्बल 17 तरुणांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर 4 मध्ये असलेला सुभाष टेकडी परिसर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो.याच परिसरात उच्चपदस्थ शासकीय आजी माजी अधिकारी देखील वास्तव्यास आहेत.डिफेन्स भागात एक पालिकेने एमएमआरडीएच्या निधीतून सौचालय बांधलेले त्याच्या टाकीवर जुगाराचा डाव रंगल्याची खबर विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी पथकासोबत धडक दिली आणि 17 च्या आसपास जणांची धरपकड केली.

धरपकड केल्यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी हातात माईक घेऊन आणि पोलिसांसोबत पायी चालत लॉक डाऊनचा गैरफायदा घेणाऱ्या मंडळींचा चांगलाच समाचार घेतला.त्यांनी भीमशक्ती रोड, सुभाष टेकडी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे घरीच थांबा,पोलीस,पालिकेला सहकार्य करा असे आवाहन केले.

आपली प्रतिक्रिया द्या