कार्तिकीला कडक संचारबंदी नको

कायदा-सुव्यवस्था नीट रहावी, फार गर्दी होऊ नये, याकरिता उपाययोजना ठीक आहे. मात्र इतकी कडक संचारबंदी लागू करणे योग्य नसल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह दहा गावांत दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावर पंढरपूर दौऱयावर आलेल्या फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र सरकार सीबीआय, ईडीला छापे टाकायला सांगत नाही. मी कधी त्यांना छापे टाकायला सांगत नाही व माझे ते काही ऐकत नाहीत. एजन्सींना स्वातंत्र्य आहे. एजन्सींचा गैरवापर केला असता तर परिस्थिती वेगळी दिसली असती असा दावाही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या