जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांचा छापा; 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

कोतवाली पोलिसांनी रविवारी रेल्वे स्टेशन परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 7 मोबाईल, पत्ते, रोख रक्कमेसह 71 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे कॉलनी संरक्षण भिंतीचा आडोश्याला एकत्र येऊन जुगार खेळत सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना याची दाखल घेत तात्काळ तिथे छापा टाकला. या छपयंत पोलिसांनी 8 जणांना अटक केली व 71 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे.