
लॉकडाऊन मुळे संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात देशी-विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद आहे. यामुळे दारुसाठी तळमळणाऱ्या तळीरामांच्या झुंडी आता गावठी दारुसह विषारी केमिकलपासून तयार करण्यात येत असलेल्या बनावटी दारुकडे वळतांना दिसत आहेत. पूर्णा येथे विनोद रत्न हे पेट्रोलिंग करत असताना कातनेश्वर नांदगाव- डांबरीकरण रस्त्यावर तोंडाला मास्क न लावता दुचाकीवर फिरत असताना दुचाकी क्रमांक MH 22 AR 1362 वर विनापरवाना बेकायदेशीररित्या हातभट्टी दारू विक्रीच्या उद्देशाने आढळून आला. अंदाजे 4 लिटर हातभट्टी दारू कॅन सोबत जवळ आढळून आले. पोलिसांनी एकूण मुद्देमला 30900 रुपयांचे साहित्य जप्त केले.
याप्रकरणी पुर्णा पोलीस स्थानकात आरोपी सुरज सुभाष जाधव विरोधात गु.र.न.160/2020 कलम 188,269,270,271 साथीचे रोग बंद प्रतिबंध कायदा कलम 2,3,4,महराष्ट्र.प्रो,कायदा 65(इ) (फ) 83 नुसार दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सा.पो.नि. नागरगोजे करत आहेत

































































