
लॉकडाऊननंतर नाट्यगृहे जेव्हा सुरू होतील, तेव्हा ’सेकंड इनिंग’ हे नवंकोरं नाटक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज असेल. अथर्व थिएटर्सच्या ’सेकंड इनिंग’ या नाटकाचे लेखन दिग्दर्शन संजय मोने यांचे आहे तर निर्माता संतोष काणेकर आहेत. काही नात्यात सोशल डिस्टनसिंग पाळाकं लागतं…काही नात्यांना पर्याय शोधाका लागतो…अशी नाटकाची कॅचलाइन आहे. प्रेम आणि त्यातील दुरावे, विनोदी अंगाने प्रेक्षकांसमोर उलगडले जाणार आहेत.
अर्ध्या तासाचे चार अंक
‘सेकंड इनिंग’ नाटकात अर्ध्या तासाचे चार अंक असतील. नाटकाचे लेखन आधीच सुरू केले होते, लॉकडाऊनमध्ये मोकळा वेळ मिळालाय. टप्प्याटप्प्याने पक्का ड्राफ्ट तयार करतोय, अशी माहिती लेखक संजय मोने यांनी दिली.
कथानकाविषयी मोने म्हणाले, पतिपत्नीच्या आयुष्यात दुसरं नातं आलंय. त्यामुळे ते विभक्त झालेत. मात्र त्यानंतरही त्यांचे संबंध खूप चांगले आहेत. मग त्यांनी घटस्फोट का घेतला, असा त्यांच्या दोन मुलांना प्रश्न पडलाय. विनोदी, हलकेफुलवे असे ’सेकंड इनिंग’ नाटक आहे.
फोल्डिंग नेपथ्य, कमीत कमी टीम
लॉकडाऊननंतर नाटक जेव्हा सुरू होईल तेव्हा सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करणे ही प्रेक्षकांबरोबर आमचीही जबाबदारी आहे. त्यामुळे ते कमीत कमी टीममध्ये कसं करता येईल, याचा विचार करतोय. मेटलचा कापर टाळणे, नेपथ्यातही फोल्डिंगचा वापर कसा करता येईल, ते बॅग्जमधून कसे वाहून नेता येईल यादृष्टीने विचार सुरू आहे, असे निर्माता संतोष काणेकर यांनी सांगितले. जुलैपासून ’सेकंड इनिंग’ चे कास्टिंग फायनल करून वाचन सुरू होणार आहे.

























































