Lok Sabha Election Result 2024: शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी

ठाणे लोकसभा मतदारसंघातून मिंधे गटाचे नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. या मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांचा निसटता पराभव झाला.

ठाणे हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघामध्ये सध्या ठाणे जिल्ह्यामधील 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. 2008 मध्ये, भारतीय सीमांकन आयोगाने पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन करून ठाणे आणि कल्याण ही दोन नवीन मतदारसंघ तयार केली. या मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे आणि मिंधे गटाचे नरेश म्हस्के यांच्यात लढत झाली. यात शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी झाले.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

पंधरावी लोकसभा 2009-14  डॉ. संजीव गणेश नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

सोळावी लोकसभा 20014-19 राजन विचारे (शिवसेना)

सतरावी लोकसभा 20019-24 राजन विचारे (शिवसेना)