Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निकालाचे Live Update –
– आवाज शिवसेनेचाच! मोदी रस्त्यावर उतरले, पण मुंबईकरांनी आसमान दाखवले!!
– कांद्याने रडवलं! शेतकऱ्यांचा रोष मतपेटीतून दिसला, भारती पवार यांचा 1 लाख मतांनी पराभव
– सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचा दणदणीत विजय
– भिवंडी लोकसभा मतदारसंघातून बाळ्यामामा म्हात्रे विजयी
– माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला
– रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे विजयी, विनायक राऊत यांचा निसटता पराभव
– ईशान्य मुंबईत मशाल पेटली; शिवसेनेचे संजय दिना पाटील विजयी
– पुणे लोकसभा मतदारसंघ; मुरलीधर मोहोळ विजयी
– उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्ज्वल निकम पराभूत
– वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी विजयी
– वर्ध्यात अमर काळे विजयी, भाजपच्या रामदास तडस यांचा पराभव
– यवतमाळ – वाशिममध्ये महाविकास आघाडीचे संजय देशमुख आघाडीवर
– ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील आघाडीवर
– शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हेंचा विजय, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव
– बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय, सुनेत्रा पवार पराभूत
– अमरावतीत बळवंत वानखेडे विजयी, नवनीत राणांचा पराभव
– शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय, मिंधे गटाच्या सदाशिव लोखंडेंचा पराभव
– अमेठीत भाजपच्या बहुरानीचा दारुण पराभव, काँग्रेसने उधळला विजयाचा गुलाल
– सोलापुरात प्रणिती शिंदे यांची विजयी आघाडी
– कोल्हापुरातून शाहु महाराज छत्रपती यांचा 94 हजार 832 मतांनी विजय
– ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील आघाडीवर
– परभणीत संजय जाधव 60 हजार मतांनी आघाडीवर
– नंदुरबार मतदारसंघातून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी विजयी
-दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विजयी
दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत विजयी झाले आहेत.
– अकोल्यात प्रकाश आंबेडकर 89 हजार मतांनी पिछाडीवर; महाविकास आघाडीचे अभय पाटील आघाडीवर
– नगरमध्ये निलेश लंके आघाडीवर
– कल्याणमध्ये चार ईव्हीएम मशीन बिघडले. मतमोजणी थांबली. यंत्र बिघडल्याने व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार
– तामिळनाडूतील कोईम्बतूर मतदारसंघात के अन्नामलई पिछाडीवर.
– पहिला निकाल कर्नाटकातून आला. प्रज्वल रेवण्णा याचा दारुण पराभव
– पंजाब मध्ये भाजपचा सुपडा साफ, एकही जागेवर आघाडीवर नाही, काँग्रेस सात जागांवर आघाडीवर
– पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर
– केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पिछाडीवर, काँग्रेसचे कल्याण काळे सहा हजार मतांनी आघाडीवर
– उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर आघाडीवर
– महाराष्ट्राचे कल महाविकास आघाडीच्या दिशेने; 29 जागांवर मजबूत आघाडी
– रावेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मतमोजणी थांबवली
– साताऱ्यात बाराव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे 86 हजार मतांनी आघाडीवर
– दिल्लीत सातपैकी तीन जागांवर आप आघाडीवर
– तामिळनाडूनत द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष 21 जागांवर आघाडीवर
– पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 23, भाजप 13, काँग्रेस 02, अन्य – 0
– सुप्रिया सुळे 21 हजार मतांनी पुढे
– उत्तर प्रदेशात भाजप 34, समाजवादी पार्टी – 36, बसपा – 0, काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर
– महाराष्ट्रात तीन केंद्रीय मंत्री पिछाडीवर; रावसाहेब दानवे, नारायण राणे, कपिल पाटील मागे
– जालना मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे पिछाडीवर
– अयोध्येतून भाजप पिछाडीवर, सपाचे अवधेश प्रसाद पाच हजार मतांनी आघाडीवर
– हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सत्यजित पाटील सरुडकर आघाडीवर
– ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील 12 हजार 981 मतांनी आघाडीवर
– दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई 6 हजार 547 मतांनी आघाडीवर
– कोकणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विनायक राऊत आघाडीवर
– साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे वीस हजार मतांनी आघाडीवर
– धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर 37 हजार मतांनी पुढे
– चंद्रपूरात सुधीर मुनगंटीवार 27 हजार मतांनी पिछाडीवर
– हैदराबादमध्ये असदुद्दीन औवेसी पिछाडीवर
– मुंबई दक्षिण मतदारसंघातून अरविंद सावंत आघाडीवर
– नागपूरात नितीन गडकरी 13 हजार मतांनी पुढे
– सोलापूर मध्ये तिसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे 21000 मतांनी आघाडीवर….
– नाशिकमधून शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजाभाऊ वाजे 36000 मतांनी आघाडीवर
– हिंगोलीमधून शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर पहिल्या फेरीत 2500 मतांनी आघाडीवर
– नगरमधून निलेश लंके आघाडीवर
– लातूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजी काळगे आघाडीवर
– शिरूर चौथ्या फेरीअखेर अमोल कोल्हे आघाडीवर
– रायगडमधून अनंत गिते 3500 मतांनी आघाडीवर, अजित पवार गटाचे तटकरे पिछाडीवर
– वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे दुसऱ्या फेरीनंतर 4231 मताने आघाडीवर आहे
– नंदुरबारमधून काँग्रेसचे गोवाल पाडवी 50 हजार मतांनी पुढे
– कोल्हापूरमधून शाहू महाराज 13 हजार मतांनी पुढे
– देशात एनडीए – 276, इंडिया आघाडी 229 जागांवर आघाडीवर
– महाराष्ट्रात महाविकास आघाडी 27 जागांवर तर महायुती 18 जागांवर आघाडीवर
– वायनाडमधून राहुल गांधी 50 हजार मतांनी आघाडीवर
– मंडीमधून भाजपच्या कंगना रणौत पिछाडीवर
– महाराष्ट्रात महाविकास आघाडी 27 जागांवर तर महायुती 18 जागांवर आघाडीवर
– स्मृती इराणी अमेठीतून पिछाडीवर
– वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
– यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात पहिल्या फेरी अखेर संजय देशमुख 6 हजार 188 मतांनी आघाडीवर
– शिरुर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर महा विकास आघाडीचे अमोल कोल्हे 9553 मतांनी आघाडीवर
– बारामतीतून सुप्रिया सुळे दहा हजार मतांनी आघाडीवर
– धाराशिवमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ओमराजे निंबाळकर सुमारे 12000 मतांनी आघाडीवर
– बजरंग सोनावणे पहिल्या फेरीत 13 हजार मतांनी पुढे, पंकजा मुंडे पिछाडीवर
– मराठवाड्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चारही उमेदवार आघाडीवर
– बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर, बजरंग सोनावणे आघाडीवर
– महाराष्ट्रात महाविकास आघाडी 25 जागांवर तर महायुती 22 जागांवर आघाडीवर
– अमरावतीतून नवनीत राणा पिछाडीवर
– महाराष्ट्रात शिवसेनेची धगधगती मशाल, आठ जागांवरील उमेदवार आघाडीवर
अरविंद सावंत, अमोल किर्तीकर, चंद्रकांत पाटील, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भारती कामडी, संजोग वाघेरे-पाटील, संजय जाधव आघाडीवर
– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 11
काँग्रेस – 05
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – 05
भाजप – 13
मिंधे गट – 04
अजित पवार गट – 0
– हातकणंगलेतून सत्यजित पाटील आघाडीवर
– धाराशिवचे शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आघाडीवर
– राज्यात महाविकास आघाडी 13 ठिकाणी तर महायुती 10 ठिकाणी आघाडीवर
– उत्तर मध्य मधून वर्षा गायकवाड व ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील आघाडीवर
– मुंबईतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद सावंत, अमोल किर्तीकर आघाडीवर
– शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर
– संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आघाडीवर
– आतापर्यंतची देशभरातील आकडेवारी – एनडीए – 35, इंडिया -11
– बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर
– पोस्टल मतमोजणीला देशभरात सुरूवात
– नांदेडमध्ये 5239 पोस्टल मतांची मोजणी सुरू
– माढ्यात 6000 पोस्टल मतांची मतमोजणी सुरू
– मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या तुकड्या, कडक सुरक्षा व्यवस्था
– मतमोजणी केंद्रावर निवडणूक कर्मचारी व राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी
– लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाला अवघे काही तास उरले.