
सामना प्रतिनिधी । पालघर
पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या ‘साम-दाम-दंड-भेद’ आणि ईव्हीएम घोटाळ्याचा अखेर विजय झाला. एका रात्रीत झालेल्या ८२ हजार मतांच्या ‘चीटिंग’मुळे भाजपचे ‘आयात’ उमेदवार राजेंद्र गावीत यांची २९ हजार ५७४ मतांनी सरशी झाली. मात्र पहिल्यांदाच या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेने त्यांना जबरदस्त टक्कर दिली. शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारत तब्बल २ लाख ४३ हजार २०६ इतकी दणदणीत मते मिळवली. बहुजन विकास आघाडीची शिट्टी तिसऱ्या नंबरवर घसरली. अस्तित्वहीन झालेल्या माकपने चौथ्या क्रमांकाची मते मिळवून राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेसच्या दामोदर शिंगडा यांना ५० हजारांचा टप्पाही गाठता आला नाही. ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. निवडणूक आयोगाला वेठीला धरून भाजपने पालघर कसेबसे राखले, त्यामुळे हा भाजपचा नव्हे तर निवडणूक आयोगाचा विजय आहे, अशीच प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. सूर्या कॉलनी येथील गोडाऊनमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली, भाजपचे राजेंद्र गावीत, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि बविआचे बळीराम जाधव यांच्यात सुरुवातीपासूनच कांटे की टक्कर सुरू होती. सुरुवातीला तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या वनगा यांनी मुसंडी मारून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. अत्यंत कमी मतांच्या फरकाने वनगा गावीत यांच्या मागे होते. ३२ व्या फेरीअखेर गावीत यांना विजयी घोषित करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सर्व मंत्री पालघरात तळ ठोकून होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेऊन उत्तर भारतीय मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपला पालघर जिंकताना अक्षरशः दमछाक झाली. गावीतांना अवघी २ लाख ७२ हजार ७७२ मते मिळाली. शिवसेनेने पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढवत अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. मतदारांनीही शिवसेनेवर विश्वास दाखवत २ लाख ४३ हजार २१० मते पारड्य़ात टाकली. त्यामुळे भाजपला शेवटच्या क्षणापर्यंत चांगलाच घाम फुटला.
लोकशाहीचा खून करून भाजपने निवडणूक जिंकली
भाजपचा हा विजय खोटा आणि फसवा आहे. ही पूर्ण निवडणूकच संशयाच्या घेऱ्यात अडकली आहे. लोकशाहीचा खून करून भाजपने ही निवडणूक जिंकली आहे, असे सांगतानाच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला याची किंमत चुकवावीच लागेल, असा इशारा शिवसेना नेते आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ज्या भागात शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत त्या भागातील ईव्हीएम मशीन बंद पाडून चार ते पाच तास हजारो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले, असे सांगून शिंदे म्हणाले, आधी ४६ टक्के मतदान झाल्याची घोषणा केली. दुसऱ्या दिवशी ५३ टक्क्यांची घोषणा केली. निवडणुकीच्या इतिहासात आजवर असा खेळ पहिल्यांदाच झाला आहे. मतमोजणीच्या २० ते २४ फेऱ्यातही वनगा आणि गावीत यांच्या मतांमध्ये मोठी तफावत करण्यात आली. या निवडणुकीत सत्ता आणि सरकारी यंत्रणेचा बेकायदेशीर वापर करण्यात आला. बेफाम पैसे वाटप झाले. निवडणूक यंत्रणा दुबळी पडली होती. ती सपशेल भाजपला मदत करत होती. या साऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे आम्ही केली आहे.
पैशांचा महापूर आणि भाजपच्या षडयंत्राचा विजय
पालघरचा विजय हा भाजपने आणलेला पैशांचा महापूर आणि ईव्हीएम घोटाळा, निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून केलेला षडयंत्राचा विजय आहे, मुख्यमंत्र्यांच्या ‘साम-दाम-दंड-भेदा’चा विजय आहे, त्यांचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली. वसई-नालासोपाऱ्यातील मतदानाची टक्केवारी वाढली असती तर चित्र वेगळे दिसले असते. ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदानासाठी आलेली नोकरदार माणसे निघून गेली. त्याचा फटका नक्कीच आमच्या पक्षाला बसला. ईव्हीएम मशीन बंद पडली म्हणून रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान करू दिले, असे निवडणूक आयोग सांगतात, पण वसई-विरारमध्ये कुठेही ९ वाजेपर्यंत मतदान सुरू नव्हते. जिथे भाजपला अनुकूल वातावरण होते तिथेच ९वाजेपर्यंत मतदान झाले, असा आरोप ठाकूर यांनी केला. ही निवडणूक हरलो म्हणून काय झाले, घाबरत नाही. आमचे कार्यकर्ते दुप्पट जोमाने आताच कामाला लागले आहेत.
जनतेने भाजपला नाकारले
भाजपला सत्तेचा माज आला असून साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून त्यांनी पालघरची निवडणूक जिंकली. मात्र २०१४ च्या निवडणुकीची तुलना केली तर भाजपच्या मतांची संख्या कमी झाली असून जनतेने भाजपला सपशेल नाकारले असल्याची प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य अशोक ढवळे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, २०१४ च्या लोकसभा निकडणुकीत चिंतामण कनगा यांना ५ लाख ३२ हजार मते पडली होती. ती मते आता कमी झाली असून २ लाख ७२ हजार ७८२ याचाच अर्थ मतांची संख्या कमी झाली आहे.
भाजपबद्दल जनतेचा भ्रमनिरास काढत चालला आहे.भाजपने पैशाचा कापर केला व प्रचंड होर्डिंग लाकली. मतदारांना पैसे काटप केले असे रिपोर्ट आले आहेत. निकडणुकीच्या बाबतीतही अनेक तक्रारी आल्या असून सदर ईव्हीएम मशीन या सुरतमधील खासगी कंपनीकडून आणल्या. मतदानाची टक्केकारी ४६.५० टक्के जाहीर झाली असताना ती लगेच ५३ टकक्यांवर कशी आली? हे सर्क संशयास्पद आहे.
- हाच भाजपचा साम-दाम-दंड-भेद
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साम-दाम-दंड-भेद वापरण्यास सांगून मोठा ऍटॅक करण्याची दिलेली चिथावणी.
भाजपने खुलेआम पैशांचे वाटप केले. - चिंतामण वनगा यांचे छायाचित्र प्रचारात वापरून सपशेल चीटिंग केली.
- मतदानाच्या दिवशी तब्बल २८८ ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन बंद पडण्याचा घोटाळा झाला.
- मतदानानंतर जाहीर केलेली ४६.५० इतकी मतांची टक्केवारी रातोरात बदलून ती ५३.२२ इतकी केली. यात लाखभर मते वाढली ती कोणाच्या पारड्य़ात पडली?
- मतमोजणीत २० ते २४ फेऱ्यांदरम्यान शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि भाजपच्या राजेंद्र गावीत यांच्या मतांमध्ये अचानक मोठा फरक.
































































