निविदा प्रक्रियेपूर्वीच कामाला सुरुवात अधिकाऱयांची चौकशी करा; लोणंद विकास मंचची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोणंद नगरपंचायतीच्या अजब कारभाराचा नमुना समोर आला आहे. तारेचे कंपाऊंड करण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच हे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी पदाधिकारी आणि अधिकाऱयांची चौकशी कराकी, अशी मागणी लोणंद विकास मंचने पत्रकाद्वारे केली आहे.

लोणंद विकास मंचने पत्रकात म्हटले आहे की, लोणंद नगरपंचायतीने पाच दिवसांपूर्वी शहरातील गणपती मंदिरासमोरील मोकळय़ा जागेत तारेचे कुंपण करण्यासाठीची 1 लाख 69 हजार 101 रुपयांची निविदा काढली होती. ही निविदा भरण्याची मुदत 16 रोजी ठेकण्यात आली होती. मात्र, निविदा भरणे व ती फोडण्यापूर्वीच दि. 14 रोजी या कामास सुरुकात करण्यात आली आहे. याशिवाय या जागेमध्ये सँडक्रश व खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे या निविदेची मुदत संपण्यापूर्वीच एका ठराविक कंत्राटदारास दिल्याचे निष्पन्न होत आहे. यामध्ये गैरव्यवहार झाला का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्कीच कुंपण घालण्यास परवानगी कशी काय दिली? या गैर कायदेशीर कृत्यांमध्ये प्रशासनातील कोण कोण अधिकारी सामील आहेत? कुंपण करण्याची घाई का करण्यात आली? असे सवाल उपस्थित होत आहेत. याचा खुलासा लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायतीच्या प्रशासनाने करणे आकश्यक आहे. लोणंद नगरपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा कळस चालू असल्याचा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे. लोणंद किकास मंचचे अध्यक्ष राजेंद्र डोईफोडे, प्रकीण क्हाकळ, नीलेश शेळके पाटील, म्हस्कूआण्णा शेळके-पाटील, शकील इनामदार, किशाल जाधक, नितीन धायगुडे-पाटील यांच्या पत्रकावर स्वाक्षरी आहेत.