
सामना ऑनलाईन । साऊथम्प्टन
लीड्स लसिथ मलिंगाने शुक्रवारी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. वर्ल्ड कपमध्ये खेळताना सर्वाधिक जलद 50 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन या दिग्गज गोलंदाजांचा विक्रम मोडीत काढला.
शुक्रवारी मलिंगाने 33 व्या षटकात जोस बटलरला बाद करीत सर्वाधिक जलद 50 गडी बाद करण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. जलद 50 गडी बाद करण्याचा विक्रम याआधी ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन या दोघांच्या नावावर संयुक्तपणे होता.


























































