लोणी येथील विराज राजेंद्र विखे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

2244
molestation-1

नगर जिल्हातील लोणी येथील विराज राजेंद्र विखे याच्याविरुद्ध महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करून तिचे बनावट फेसबुक खाते तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी येथील कोतवाली पोलिसांनी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून आता हे प्रकरण लोणी पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आले आहे.

विराज राजेंद्र विखे असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी 2017 ते 2018 मध्ये प्रवरानगर लोणी येथे पद्मश्री विखे पाटील ज्युनियर व सीनियर कॉलेजला शिक्षण घेत होती. त्यावेळी विराज याने युवतीचा पाठलाग करून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे म्हणून तू जर मला हो म्हणाली नाही तर मी माझे जीवाचे बरे-वाईट करीन, असे म्हणून वेळोवेळी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

त्यामुळे युवतीने त्याठिकाणी शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि त्यानंतर नगर येथून पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. या प्रकारानंतर विराज याने युवतीच्या नावाचा वापर करून फेसबुकवर बनावट अकाउंट सुरू केले. तिची बदनामी करण्याच्या हेतूने नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट टाकून विराज हा नगर येथे आला आहे, असे लोकेशन फेसबुकवर टाकून युवतीला भीती दाखवून दबाव आणण्याचा प्रयत्न करून पाठलाग केला.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम 354, 506, 507 तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती कोतवाली पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या