लव्ह जिहाद – शाकीब बनला ‘अमन’, भांडाफोड होताच तरुणीचे मुंडके उडवले, हातही धडावेगळे केले

5837

उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एका शेतात पोलिसांना मुंडके आणि हात कापलेल्या अवस्थेत तरुणीचा अर्धनग्न मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पंजाब येथील बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या तरुणीला एका मुस्लिम तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. शाकीब नावाचा हा तरुण अमन बनून भेटला. मात्र भांडाफोड होताच तरुणाने तरुणीची निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकीबच्या प्रेमजाळ्यात अडकलेली तरुणी घरातून 25 लाखांचे दागिने घेऊन त्याच्यासोबत फरार झाली होती. मेरठ येथे आल्यावर आपण त्याच्यासोबत पळून आलोय तो अमन नसून शाकीब असल्याचे तरुणीला कळते. भांडाफोड झाल्यावर दागिने आणि पैशांच्या हव्यासापोटी तरुणाने तरुणीची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह अन्य तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलीस अधिकारी अजय साहनी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 13 जून 2019 ला लोईया गावात सबी अहमद यांच्या उसाच्या शेतात शेजारी राहणाऱ्या ईश्वर पंडित यांनी कुत्र्याला तोंडात मानवी हात घेऊन पळताना पाहिले. या भागात अधिक पाहणी केली असता एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. तरुणीचे मुंडके आणि एक हात गायब होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला मात्र ओळख पटली नव्हती.

वर्षभर तपास केल्यावर लागला सुगावा

पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले, मात्र सुगावा लागत नव्हता. अखेर पंजाब येथे एक तरुणी गायब असल्याचे आढळले. 23 वर्षीय तरुणी गायब असल्याची तक्रार लुधियाना भागात नोंदवण्यात आली होती. मयत तरुणी बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. तर लोईया गावचा रहिवासी शाकीब येथे नोकरी करत होता. त्याने आपले नाव अमन असे सांगितले होते.

ईदच्या दिवशी भांडाफोड

शाकीबने अमन बनून तरुणीला फसवले. मे महिन्यात दोघे लुधियाना सोडून फरार झाले. जाताना तरुणीने घरातील 25 लाखांचे सोनेही नेले. दोघे जवळपास एक महिना दौराला येथे भाड्याच्या घरात राहिले. ईदच्या दिवशी शाकीब तिला आपल्या घरी घेऊन गेला. तिथेच त्याचा भांडाफोड झाला.

कोल्ड्रिंकमध्ये नशा येणारे औषध मिसळून हत्या

भांडाफोड होताच दोघात वाद झाला. शाकीबने तरुणीची कशीबशी समजूत काढली आणि तिला घरातून बाहेर घेऊन आला. ईदच्या दिवशी रात्री 9 वाजता कोल्ड्रिंकमध्ये नशा येणारे औषध मिसळले आणि पाजले. बेशुद्ध होताच शाकीबने तरुणीला शेतात नेले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. ओळख पटू नये म्हणून तिचे मुंडके आणि हात कापून फेकून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या