लोअर परळ पुलासाठी, 24 डिसेंबरपर्यंत 40 दिवस नाइट ब्लॉक

569

पश्चिम रेल्वे लोअर परळच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी 14 नोव्हेंबरच्या रात्रीपासून तब्बल 40 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेणार आहे. हा नाइट ब्लॉक 24 डिसेंबरपर्यंत 40 दिवस चालणार आहे. मध्यरात्री 1.25 ते पहाटे 5.25 वाजेपर्यंत डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे पहाटे सुटणाऱया काही लोकल रद्द केल्या आहेत.

रद्द लोकल फेऱ्या

पहाटे 5.06 वा.
महालक्ष्मी ते भाईंदर लोकल

पहाटे 5.20 वा.
महालक्ष्मी ते बोरिवली लोकल

स. 6.07 वा.
बोरिवली ते चर्चगेट लोकल

स. 6.27 वा.
बोरिवली ते चर्चगेट लोकल

या लोकल वळविण्यात येणार
चर्चगेटवरून सुटणाऱया पाच लोकल ट्रेनचा मार्ग बदलण्यात येणार आहे. पहाटे 4.15 ची चर्चगेट-विरार लोकल, पहाटे 4.19, 4.38, 4.46, 5.00 वाजताची चर्चगेट-बोरिवली लोकल मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येत आहेत. या लोकलना लोअर परळ आणि माहीम स्थानकांदरम्यान डबल थांबा देण्यात येणार असला तरी महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड या स्थानकांवर त्यांना थांबा मिळणार नसल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या