ठाण्यात एलपीजी स्फोट; 9 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

इंदिरा नगर येथील बौद्ध विहारात शनिवारी रात्री एलपीजी सिलिंडरचा जबरदस्त स्फोट झाला. त्यात मकबूल खान, गोमती शर्मा, कमलावती शर्मा, नारायण शर्मा, शिव शर्मा, बळीराम भंडारे, कल्पेश रेडकर, आदित्य लहाने, समशाद सिद्दीकी हे जखमी झाले असून जखमींमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.

शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. सभागृह नेते नरेश म्हस्के, नगरसेवक सुधीर कोकाटे, एकनाथ भोईर, हेमंत पवार, दिलीप बारटक्के यांनी मदतकार्य केले.