तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी सिलिंडर बंद होईल, छगन भुजबळ यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राच्या पत्रकाचा हवाला देत, तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी गॅस सिलिंडर पुरवठा बंद होईल, असा इशारा आज दिला. निवासी आणि व्यावसायिक या आस्थापनांमध्ये एलपीजी आणि पीएनजीचा सुलभ पुरवठा कसा करता येईल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व राज्यांच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते.

ओसी देताना पीएनजी सक्तीची अट

सगळ्या नगरपालिका, महापालिकांनी पीएनजीच्या जोडण्या वाढवल्या पाहिजेत. पाणी आणि वीज कनेक्शन असल्यावर ओसी दिली जाते त्याप्रमाणे पीएनजी कनेक्शनच्या सक्तीची अट टाकली पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.

…तर तुमचे एलपीजी कनेक्शन बंद

जिथे गॅस पाइपलाइन गेली आहे तिथे पीएनजी कनेक्शन घेतले पाहिजे. अन्यथा एलपीजी कनेक्शन बंद होणार. पीएनजी कनेक्शनसाठी शेजारच्या इमारत तसेच पालिकेच्या परवानगीची गरज नाही, असे ते म्हणाले.