L&T Mumbai Open 2026 – दर्जा सेमेनिस्तजा, माई यामागूची, लिओलिया जीनजीन, मननचया सवांगींकवे यांची आगेकूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५के डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत एकेरीत दर्जा सेमेनिस्तजा, माई यामागूची, लिओलिया जीनजीन, मननचया सवांगींकवे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

मुंबई येथील एमएसएलटीएच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत चुरशीच्या लढतीत काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या जपानच्या माई यामागूची हिने क्वालिफायर मोरोक्कोच्या यास्मिन कब्बाजचा ४-६, ६-४, ७-६(५) असा पराभव करून आपली आगेकूच कायम ठेवली. हा सामना २तास ४०मिनिटे चालला.

दुसऱ्या मानांकित लात्वियाच्या दर्जा सेमेनिस्तजाने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत जपानच्या माई होंतामाचा ६-४, ७-६(३) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. हा सामना १तास ५५मिनिटे चालला.

तिसऱ्या मानांकित फ्रान्सच्या लिओलिया जीनजीन हिने जपानच्या मीहो कुरामूचीचे आव्हान ६-३, ६-३ असे मोडीत काढले. गतउपविजेत्या थायलंडच्या मननचया सवांगींकवे हिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जपानच्या मिसाकी मात्सुदाला ६-४, ६-१ असे पराभुत करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या मानांकित रशियाच्या पोलिना इचेंको व एलिना प्रिदंकिना या जोडीने भारताच्या प्रार्थना ठोंबरे व रशियाच्या एल्व्हेंटिना इब्रागिमोव्हा यांचा ६-१, ६-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी:
दर्जा सेमेनिस्तजा(२)(लात्विया) वि.वि.माई होंतामा(जपान)६-४, ७-६(३);
माई यामागूची(जपान)वि.वि. यास्मिन कब्बाज(मोरोक्को)४-६, ६-४, ७-६(५);
मननचया सवांगींकवे(थायलंड)वि.वि.मिसाकी मात्सुदा(जपान)६-४, ६-१;
लिओलिया जीनजीन(३)(फ्रान्स)वि.वि.मीहो कुरामूची(जपान)६-३, ६-३.

दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
पोलिना इचेंको(रशिया)/एलिना प्रिदंकिना(२) वि.वि.प्रार्थना ठोंबरे(भारत/एल्व्हेंटिना इब्रागिमोव्हा(रशिया) ६-१, ६-१;
हिरोको कुवाटा(जपान)/सोह्यून पार्क(दक्षिण कोरिया) वि.वि.दर्जा सेमेनिस्तजा(लात्विया)/जुजाना पावलीकोव्सका(पोलंड)६-०, ६-४.