
लखनऊमधील वजीरगंज न्यायालयात स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये काही वकील जखमी झाल्याचे कळते आहे. धक्कादायक बाब ही आहे की न्यायालयामध्ये तीन जिवंत बॉम्बही सापडलेले आहे. सुदैवाने या स्फोटामध्ये कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाहीये. संजीव लोधी नावाच्या एका वकिलावर हा हल्ला करण्यात आला होता, त्यासाठीच हा बॉम्ब फेकण्यात आला होता अशी माहिती मिळाली आहे.



























































