उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे ग्राहकाच्या घरी महागडे मोबाईल फोन पोहोचवण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय डिलिव्हरी बॉयची निर्घृणपणे हत्या झाल्याचे समोर आले आहे. भरत प्रजापती असे मयताचे नाव आहे. महागड्या मोबाईलचे पैसे द्यायला नको म्हणून गजानन, हिमांशी आणि आकाश यांनी मिळून त्याची हत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
लखनऊच्या निशातगंज भागात राहणारा भरत प्रजापती गेल्या 7 वर्षांपासून फ्लिपकार्टमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी हिमांशी कनौजियाच्या नंबरवरून Google Pixel आणि Vivo कंपनीचे 1 लाख रुपयांचे फोन ऑर्डर करण्यात आले होते. कॅन ऑन डिलिव्हरी हा पर्यात निवडला असल्याने 23 सप्टेंबर रोजी भरत दोन्ही मोबाईल फोनची डिलिव्हरी करण्यासाठी हिमांशूच्या घरी पोहोचला.
भरतने हिमांशूनला फोन करून फोनची डिलिव्हरी घेण्यास बोलावले, मात्र त्याने कॉन्फरन्सद्वारे गजाननशी बोलणे करून दिले आणि तो फोनची डिलिव्हरी स्वीकारेल असे म्हटले. याच संधीचा फायदा उचलत गजाननने आकाशच्या मदतीने भरतची गळा दाबून हत्या केली आणि त्याच्याजवळील मोबाईल, पैसे घेऊन पोबारा केला. तत्पूर्वी दोघांनी एका तलावात भरतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.
भरत बेपत्ता झाल्याचे कळताच कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात तक्रार केली. पोलिसांनी मोबाईल नंबरचे लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलिसांनी हिमांशु आणि आकाशला बेड्या ठोकल्या. त्यांनी हत्येची कबुली दिली असून भरत फोन देण्यासाठी आला तेव्हा त्याची गळा दाबून हत्या केल्याचे म्हटले. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून भरकर इंदिरा नगर तलावात फेकला.
पोलिसांनी हिमांशु आणि आकाशला अटक केली असून मुख्य आरोपी गजानन फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. तसेच तलावातून भरतचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शशांक सिंह यांनी दिली.
दरम्यान, गजाननचा भाऊ प्रेम कुमार याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, भरत आणि गजानन दोघे मित्र होते. त्यांच्यात कोणताही वाद नव्हता. गजाननने कंपनीमध्ये अडीच लाखांची हेराफेरी केल्याने त्याला काढून टाकण्यात आले होते. तो हार्डवेअरचे दुकान चालवत होता.