
इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सिझन रंगात आलेला असताना लखनौ सुपर जायंट्सला एक मोठा धक्का बसला आहे. LSG चा अष्टपैलू वानिंदु हसरंगा याने दुखापतीमुळे यंदाच्या सिझनमधून माघार घेतली आहे. आज अखेर लखनौच्या संघाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून हसरंगाच्या जागी आता दक्षिण आफ्रिकेच्या जॉर्ज लिंडेला जागा देण्यात आली आहे.
Lucknow mein swagat hai, George Linde ❤️💙
The Protea all-rounder replaces Wanindu Hasaranga in our squad for #TATAIPL 2026 pic.twitter.com/CZaSypy7ZR
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2026
लखनौ सुपर जायंट्सने ट्विटरवरून याबाबत घोषणा केली आहे. ”जॉर्ज लिंडे लखनौमध्ये आपलं स्वागत आहे. अष्टपैलू जॉर्ज याला वानिंदु हसरंगा याच्या ऐवजी संघात घेण्यात आले आहे”, असे लखनौने ट्विट केले आहे.
लखनौ सुपर जाएंट्सचा संघ १२ एप्रिलला पुढचा सामना खेळणार त्या सामन्यात लिंडे पदार्पण करू शकतो. लिंडे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. लिंडेने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 250 T20 सामने खेळले आहेत. तसेच 3 कसोटी व ४ एकदिवसीय सामने देखील त्याच्या नावावर नोंद आहेत.




























































