
2026 मधील पहिले चंद्रग्रहण येत्या 3 मार्चला दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण सायंकाळी 5 वाजून 33 मिनिटांपर्यंत पाहता येईल. हे चंद्रग्रहण मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, भुवनेश्वर, पटणा, गुवाहाटी, इम्फाळ, शिलाँग, कोहिमा आणि इटानगरमध्ये दिसेल, तर युरोप, पश्चिम आशिया, आफ्रिका, अटलांटिक महासागर आणि हिंद महासागर क्षेत्रातही हे चंद्रग्रहण पाहता येईल. पूर्ण चंद्रग्रहण न्यूयॉर्प सिटी, टोरंटो, सिडनी, मेलबर्न, टोकियो आणि बीजिंगमध्ये दिसेल.

























































