पनीर टिक्का अन् बासमती राईस; लॉर्ड्सवर खेळाडूंची मेजवानी, Menu व्हायरल

टीम इंडिया आणि इंग्लंड या संघामध्ये तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. पहिला सामना इंग्लंडने आणि दुसरा सामना टीम इंडियाने जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. लॉर्डसवर सुरू असलेल्या सामन्यात दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी दमदार खेळाच प्रदर्शन करत आहेत. खेळाडूंचा हाच उत्साह आणि ऊर्जा
कायम रहावा म्हणून त्यांच्या खाण्यापिण्य़ावरही विशेष लक्ष दिले जात आहे.

क्रिकेटवारी – पंडित बुमरा झिंदाबाद!

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळाडूंसाठी ECB कडून खास मेजवानीचा बेत आखला होता. या मेजवानीचा मेनू आता सोशल मीडिया जोरदार व्हायरल झाला आहे. व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांची जत्राच खेळाडूंसाठी भरवली होती‌. यामध्ये चिकन मिटबॉल, पनीर टिक्का, क्रश पोटॅटो, ब्रोकोली, फ्रूट सलाड, बासमती राईस यांसारख्या पदार्थांचा समावेश होता.