
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे वाढत्या महागाईने मोडलेले असताना आता केंद्र सरकारने चैनीच्या वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेत त्यांना आणखी एक धक्का दिला. या वाढीमुळे आता आम आदमीच्या नित्याच्या वापरातील एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन्स, रेफ्रिजरेटर आणि पादत्राणांसह एकूण 19 वस्तूंच्या किमतीत वाढ होणार आहे. ही आयात शुल्कवाढ बुधवारी मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आली आहे.
summary- luxury items expensive causing high import duty

























































