
माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजार व्यापारी मंडळाकडून फुल बाजारातील फुल व्यापाऱयांच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
फुल बाजारातील व्यापाऱयांच्या मुलांनी शालान्त परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या मुलांना भावी वाटचालीस प्रेरणा मिळावी यासाठी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सार्थक मनोज पुंडे उत्तम ग्रेड मिळवून एमबीए झाल्याबद्दल त्याचा विशेष सन्मानही करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सूरज चव्हाण, पुणे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे यांच्यासह व्यापारी मंडळाचे उपाध्यक्ष अविराज पवार, सदस्य प्रवीण पुंडे, अजय खाडे, अजय काwसाले, रामदास भोसले, तुषार भोसले, गणेश शेरकर व फुल बाजारातील व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.