
बॉलीवूडची धकधक गर्ल, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कॅनडातील टोरंटो येथे “दिल से… माधुरी” हा शो होता. या शोसाठी माधुरी चक्क 3 तास उशीरा पोहोचली. त्यामुळे चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. लाखो दिलो की धडकन असलेल्या माधुरीवर आता चाहत्यांनी टीका केली आहे. या टीकेनंतर आता आयोजकांनी एक निवेदन जारी केले आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षितचा लाईव्ह शो २ नोव्हेंबर रोजी टोरंटोमधील ग्रेट कॅनेडियन कॅसिनो रिसॉर्टमध्ये झाला. खर तर हा कार्यक्रम एक कॉन्सर्ट होता. मात्र याचे रुपांतर केवळ संभाषण सत्रात झाले. अशातच माधुरी या कार्यक्रमाला तीन तास उशिरा पोहोचल्यामुळे चाहत्यांची नाराजी आणखी वाढली. सोशल मीडियावर माधुरीच्या शोवर टीका केली जात आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वात वाईट शो असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर झालेल्या या टीकेमुळे आयोजकांनी एक निवेदन जारी केले आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
View this post on Instagram
निवेदनात म्हटले आहे की, “कार्यक्रम वेळेवर सुरू झाला. कार्यक्रमाची सुरूवात इंडियन आयडलच्या गायकांच्या गाण्यांनी झाली. संपूर्ण शो हा ठरल्याप्रमाणेच झाला आहे. माधुरीच्या वेळेबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या मॅनेजमेंटसोबत ठरल्याप्रमाणे शो सुरू होण्यापूर्वी 8 वाजता प्रश्नोत्तराचे सेशन होणार होते. आणि यानंतर 60 मिनिटांचा परफॉर्मन्स होणार होता. मात्र तिच्या मॅनेजमेंटसोबत संपर्क साधूनही, त्यांनी माधुरीला वेळेबद्दल चुकीची माहिती दिली. यामुळेच परिणामी ती रात्री १० वाजेच्या सुमारास उशिरा पोहोचली, असे त्या निवेदनात म्हटले आहे.































































