
माघी शुध्द जया एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी सदस्या शकुंतलाताई नडगिरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, लेखाधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.





























































