शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश, मागाठाणेवासीयांच्या दिमतीला आता बेस्टच्या वातानुकूलित बस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागाठाणे विधानसभेतील नागरिकांच्या दिमतीला आता बेस्टच्या दोन वातानुकूलित बस आल्या आहेत. येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी  टाटा पॉवर (मच्छीमार्पेट) ते बोरिवली स्थानक पूर्व आणि बोरिवली स्थानक पूर्व ते पांडेनगर कांदिवली पूर्व या मार्गावर वातानुपूलित बस सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार बेस्टने सदर मार्गासाठी वातानुकूलित बस सुरू केल्या असून आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

बोरिवली टाटा पॉवर आणि पांडेनगर कादिवली पूर्व तसेच टाटा पॉवर (मच्छीमार्केट) ते बोरिवली स्थानक पूर्व या भागातील नागरिकाची बोरिवली स्थानकापर्यंत जाताना मोठी गैरसोय होते. येथे मोठी बस चालवली जात असून ती भरण्यास जास्त वेळ लागत असल्याने त्यांची बराच वेळ लटकंती होते. त्यामुळे प्रवाशांना अनेकदा रिक्षाचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांच्या खिशाला चाट लागत असल्याची बाब प्रभाग क्रमांक 12च्या नगरसेविका गीता सिंघण आणि प्रभाग क्रमांक 25च्या नगरसेविका माधुरी भोईर यांनी निदर्शनास आणून देत या मार्गावर बेस्टची वातानुकूलित बस सुरू करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार आमदार सुर्वे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन्ही मार्गांवर आजपासून वातानुकूलित बस सुरू करण्यात आल्या आहेत. यावेळी माजी आमदार हेमेंद्र मेहेता, युवासेना कार्यकारणी सदस्य सिद्धेश कदम, नगरसेविका गीता सिंघण, माधुरी भोईर, विधानसभा संघटक सुनील चव्हाण, अशोक म्हामूणकर, महिला विधानसभा संघटक शुभदा शिंदे, उपविभागप्रमुख सुनील डहाळे, चेतन कदम, महिला उपविभागसंघटक शीला गांगुर्डे, शाखाप्रमुख काwस्तुभ म्हामणकर, अशोक परब, आत्माराम कांबळी, शुभदा सावंत, कांचन सार्दळ, सुरेखा मोरे, योगेश भोईर, संजय सिंघण, विजय मुळीक, अनिल दबडे, अनिल पटेल, सचिन केळकर आदी उपस्थित होते.