
सामना प्रतिनिधी । मालवण
“हर हिंदू की यही पुकार… पहले मंदिर फिर सरकार” असा नारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना व मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहरात मोटरसायकल रॅली काढत राम मंदिर व दत्तमंदिर येथे महाआरती करण्यात आली.
शिवसेनेच्या महाआरतीच्या निमित्ताने मालवण शहर भगवेमय झाले होते. भगवे ध्वज हाती घेतलेल्या शिवसैनिकांची घोषणाबाजी व फटाक्यांच्या आतिषबाजीने मालवण नगरी दुमदुमून गेली.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, जान्हवी सावंत, देवयानी मसुरकर, श्वेता सावंत, दीपा शिंदे, अंजना सामंत, गणेश कुडाळकर, बाबा आंगणे, बाबा सावंत, बंडू चव्हाण, सेजल परब, पंकज सादये, किरण वाळके, नितीन वाळके, मंदार गावडे, अमित भोगले, किसन मांजरेकर, तपस्वी मयेकर, महेंद्र म्हाडगूत, गौरव वेर्लेकर, बाबी जोगी, किसन मांजरेकर, दर्शन म्हाडगूत, संमेश परब, यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
मंदिराच्या उभारणीस चालना मिळेल
अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर उभे रहावे, ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भावना आहे. त्यासाठी अयोध्येत दाखल झालेल्या पक्षप्रमुखाना पाठिंबा दर्शवत शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्गातील मंदिरात महाआरती करण्यात आल्या. शिवसेना पक्ष प्रमुखांच्या अयोध्या दौऱ्यानंतर खऱ्या अर्थाने मंदिराच्या उभारणीस चालना मिळेल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी महाआरतीच्या निमित्ताने व्यक्त केला.

































































