टिकल ते पॉलिटिकल- मनसेला सत्ता नको तर प्रबळ विरोधी पक्ष बनवा

1404

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे व्हिडीओ’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत टीकेचे आसूड ओढणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती बदलत प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून देण्याचे आवाहन केले.  मी ‘ब्ल्यू प्रिंट’ऐवजी ‘ब्ल्यू फिल्म’ काढली असती तर लोकांनी पाहिली तरी असती असे उद्विग्नपणे म्हणाले.

सांताक्रुझ येथील प्रचारसभेत राज ठाकरे बोलत होते. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, या बँकेवर भाजपचीच माणसे संचालक म्हणून आहेत. खातेदार महिला या बँकेसमोर जाऊन रडत आहेत. कोणाचे लग्न होणार होते तेदेखील आता अडचणीत आले आहेत.

विधानसभेतील विरोधी पक्षनेताच सत्ताधारी पक्षात प्रवेश करतो. सत्ताधारी पक्षातील आमदारांना प्रश्न विचारण्याची हिंमतच नाही. शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी त्रस्त आहेत. यासाठी एका प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. सरकारसमोर घरंगळत जाणारा काहीच करू शकणार नाही. विरोधी पक्षातील आमदारच तुमच्या मनातील खदखद व्यक्त करू शकतो. यामुळे जिथे शक्य असेल तिथे मनसेच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या