आदित्य ठाकरे यांना वाढता पाठिंबा, ठिकठिकाणी जंगी स्वागत

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि महायुतीचे वरळीतील उमेदवार आदित्य ठाकरे यांना वरळीतून वाढता पाठिंबा मिळत आहे. ठिकठिकाणी त्यांचे हारतुरे, पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत होत आहे. वरळीतील वृत्तपत्र विक्रेते आणि वितरक यांनीही आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला.

प्रचारफेरीदरम्यान वृत्तपत्र विक्रेता आणि वितरक यांनी आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी आमदार सुनिल शिंदे, शिवसेना प्रवत्ते, नगरसेवक अरविंद भोसले आदि उपस्थित होते. जीवन भोसले, महेंद्र देसाई, शंकर रिंगे आणि बाबू सावंत यांनी संघटनेच्या वतीने विक्रेत्यांचे आभार मानले.विविध ठिकाणच्या देवस्थान ट्रस्ट, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, तसेच विविध संघटनांकडून त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. दरम्यान,शंकर मंदीर देवस्थान ट्रस्टतर्फे आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ट्रस्टतर्फे त्यांना पाठिंबाही जाहीर करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला, प्रचारयात्रेला, प्रचारसभेला वरळीतील शिवसेनाप्रेमी, शिवसैनिक, स्थानिक नागरिक प्रचंड गर्दी करत असून तरुणांकडून मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी महाविद्यालयीन तरुण, तरुणी, महिला गर्दी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या