महाराष्ट्रातील जनता निवडणूक जाहीर होण्याचीच वाट पाहत होती. निवडणूक होत आहे याचा आनंद आहे. भारतीय जनता पक्ष हरयाणात जिंकल्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक होत आहे. नाहीतर राष्ट्रपती राजवट लावली असती. आता महाराष्ट्र बुडवण्याचे काम करणाऱ्यांना जनता गाडून टाकेल, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. निवडणूक आधीच होणे अपेक्षित होते. मात्र सरकार घाबरलेले होते. नवीन शासन निर्णय काढण्यासाठी आणि बोगस कामाचे भूमिपूजन करण्यासाठी ही निवडणूक लांबणीवर नेली का? 40 दिवसांचा कमीत कमी कालावधी असला पाहिजे. मात्र 35 दिवसांत निवडणूक घेत आहेत. जनता यांचा भोंगा वाजवल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला महाराष्ट्रातील निवडणूक झाल्यानंतर झटका बसेल, असे वडेट्टीवार म्हणाले.