दिवसभरात 22 हजार रुग्ण बरे, 21 हजार 656 नवीन कोरोना रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून शुक्रवारी एका दिवसात 22 हजार 78 एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज 21 हजार 656 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 8 लाख 34 हजार 432 वर पोहोचली आहे. सध्या 3 लाख 887 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात शुक्रवारी 405 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.72 टक्के एवढा आहे.

मुंबईत 2,267 कोरोना रुग्ण

मुंबईत शुक्रवारी दिवसभरात 2,267 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 925 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 1 लाख 37,664 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 52 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 52 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 8 हजार 372 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 56 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 34 हजार 136 इतकी आहे.

दिवसभरात 96 हजार कोरोना रुग्णांची भर

हिंदुस्थानातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने शुक्रवारी 52 लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासांत 96 हजार 424 रुग्णांची भर पडल्याने देशातील एकूण रुग्णसंख्या 52 लाख 14 हजार 678 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आज 1174 मृत्यू झाले आहेत. देशात मृतांची संख्या 84 हजार 372 आहे. सध्या देशात 10 लाख 17 हजार 754 जणांकर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात 41 लाख 12 हजार 551 जणांनी कोरोनाकर मात केली.