भाजपा मोडता घालतेय! पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

659

शिवसेना आणि आघाडीचे जुळू नये यासाठी भाजपा मोडता घालतेय, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. आमच्या आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा घेऊन त्यातील कोणते मुद्दे घ्यायचे, कुठले वगळायचे ते ठरवावे लागेल. किमान समान कार्यक्रम तयार करताना वादग्रस्त मुद्दय़ांचे काय करायचे हे ठरवावे लागणार आहे. या चर्चा झाल्यानंतर सत्तावाटपाचे सूत्र, पाठिंबा याबाबत निर्णय होईल, असे पृथ्वीराज म्हणाले. आधी सर्व चर्चा करू आणि पुढे जाऊ असे आम्ही ठरविले. नाहीतर सरकारमध्ये जाऊन नंतर चर्चा करणे शक्य नव्हते. त्यामुळे काँग्रेसने वेळ काढला अशी टीका करणे योग्य नाही असे चव्हाण म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या