
राज्यात लवकरच 70 हजार पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. या भरती प्रक्रियेत कामाच्या स्वरूपानुसार उमेदवारांची निवड केली जाणार असून पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रांची तपासणी डिजिटल पद्धतीने केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवा प्रवेश नियमावली सुधारणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज बैठक झाली.
मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाइन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर द्या, असेही त्यांनी सांगितले.



























































