HSC Result – धाकधूक… बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येणार? वाचा एका क्लीकवर…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल सोमवारी (5 मे, 2025) ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता हे निकाल जाहीर होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली असून मंगळवार (6 मे) पासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल खालील संकेतस्तळावर सोमवारी दिनांक 5 मे, 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

  1. https://results.digilocker.gov.in
  2. https://mahahsscboard.in
  3. http://hscresult.mkcl.org
  4. https://results.targetpublications.org
  5. https://results.navneet.com

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.