
मुंबई, नाशिक तसेच वसई विरारमध्ये ईडीने अचानक कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. 12 ठिकाणी ईडीकडून अचानक छापेमारी करण्यात आलेली आहे. अनधिकृत बांधकामाप्रकरणी ही छापेमारी करण्यात आलेली आहे. वसई-विरार महापालिकेतील आयुक्त पदाचा कारभार मनोज कुमार सूर्यवंशी यांना नुकताच स्विकारला होता. अवघे काही तास हा पदभार स्विकारल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.
वसई विरारमधील माजी आयुक्त अनिल कुमार यांच्या निवासस्थानी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. डंपिंग ग्राउंडवर उभारल्या गेलेल्या 41 अनधिकृत इमारतींसंदर्भात ही कारवाई ईडीकडून करण्यात आलेली आहे. ईडीकडून याआधी सुद्धा वसई- विरार शहरामधील बिल्डर तसेच आर्किटेक्ट आणि महानगरपालिकेचे अधिकारी वाय. एस. रेड्डी यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली होती.
सध्या ईडीकडून अनिल कुमार यांच्या निवासस्थानी कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. वसई, विरार, नालासोपारा पूर्वेला 41 अनधिकृत इमारतींसंदर्भात ईडीकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, वसई-विरार महापालिकेतील मोठ्या अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर कारवाई सुरु झालेली आहे.