‘हॉट’ न्यूज – देशातील सर्वाधिक तापमान महाराष्ट्रातील ‘या’ शहरात नोंदवले

5305

गुरुवारी देशातील सर्वाधिक तापमान महाराष्ट्रात नोंदवण्यात आले आहे. यामुळे हळूहळू महाराष्ट्रात तापमान वाढत असल्याचं वाढत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रातील अकोला येथे देशातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले. स्कायमेट या खासगी वेधशाळेने केलेल्या नोंदणीत ही माहिती समोर आली आहे. अकोला मध्ये 41.3 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले.

temperature

दरम्यान याआधी मालेगाव येथील तापमान 41.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते.

img_20200410_095018 malegaon-temp

देशात अद्यापही म्हणावा तसा उन्हाळा सुरू झालेला नाही. सर्वसाधारणपणे मार्च महिन्यानंतर उन्हाचा तडाका तडाखा जाणवायला लागतो मात्र यंदा एप्रिल महिना उजाडून गेला तरी तापमानात फार वाढ झाल्याचे पाहायला मिळालेले नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मार्च महिन्याच्या अंतिम भागात किंवा एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात उष्णता जाणवू लागते. मार्च महिन्यात देशातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणातील गारवा कायम राहिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आता मात्र देशातील काही राज्य जसे की मध्य प्रदेश महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक ओडिसा या राज्यांमध्ये हे बऱ्याच भागात पारा 40 अंश सेल्सिअस जवळ पोहोचल्याचे दिसत आहे. तसेच हिंदुस्तानच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील हळूहळू तापमानात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या खालोखाल अकोल्याच्या खालोखाल तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे ते 40 पूर्णांक सहा इतके तापमान नोंदविण्यात आले. तर तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा असून 40.4 इतके अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या