आत्महत्येत महराष्ट्राचा क्रमांक पहिला, NCRB तून धक्कादायक माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशन क्राईम रेकॉर्ड ब्युरोने 2017 अहवाल जारी केला आहे. त्यानुसार महाराष्ट्राचा आत्महत्येत पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो.

अहवालानुसार 2017 साली देशभरतात 8 ह्जार 129 लोकांनी आत्महत्या केली. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 1488 लोकांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 968 जणांनी आत्महत्या केली.

महाराष्ट्रात आत्महत्या करणार्‍यांपैकी 951 महिला होत्या. तर पुरुषांची संख्या 537 इतकी आहे. मध्य प्रदेशमध्ये 707 महिलांनी आत्महत्या केली आहे. तर पुरुषांचे प्रमाण 262 इतके आहे. 2016 मध्येही दोन्ही राज्यात आत्महत्येचे प्रमाण अधिक होते. 2016 साली महाराष्ट्रात 768 तर मध्ये प्रदेशमध्ये 565 महिलांनी आत्महत्या केली होती.