
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पेंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील 982 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर केली आहेत. महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. यातील 31 पोलीस कर्मचाऱ्यांना ‘शौर्य पदक’, तर 4 पोलीस अधिकारी आणि सुधार सेवा विभागातील 2 कर्मचाऱयांना ‘राष्ट्रपती पदक’ देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्र पोलीस दलातील 40, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील 3, सुधार सेवा विभागातील 5 अधिकारी-कर्मचाऱयांना पुरस्कार जाहीर झाले. पुरस्कार विजेत्यांमध्ये मुंबईतील अप्पर आयुक्त डॉ. महेश पाटील, उपायुक्त पुरुषोत्तम कराड, बाळकृष्ण यादव, सहाय्यक आयुक्त महेश तावडे, उपनिरीक्षक विजय मोहिते यांचा समावेश आहे.
‘वीरता पदक’प्राप्त पोलीस अधिकारी-कर्मचारी
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी, मधुकर नैताम, पोलीस कॉन्स्टेबल संतोष नैताम, पै. सुधाकर वेलादी, (मरणोत्तर), विलास पोर्तेट, विश्वनाथ सदमेक, ज्ञानेश्वर फाडणे, दिलीप सद्मेक, रामसू नरोटे, आनंदराव उसेंडी, राजू चव्हाण, अरुण मेश्राम, नितेश वेलाडी, मोहन उसेंडी, संदीप वसाके, पैलास कोवासे, हरिदास कुलयेती, किशोर तलांडे, अनिल आलम, नरेंद्र मडावी, आकाश उईके, पै. करे इरपा आत्राम (मरणोत्तर), राजू पुसाळी, महेश जकेवार, रूपेश कोडापे, मुकेश सदमेक, योगेंद्रराव सदमेक, घिस्सू आत्राम, अतुल मडावी, विश्वनाथ मडावी नागरी संरक्षण व होमगार्ड गंगाधर वुरकुड, राजेंद्र बनसोड, नागेश्वरराव पोडदाली (तिघेही प्लाटून कमांडर).
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक
महेश पाटील (अतिरिक्त आयुक्त), बाळकृष्ण यादव (पोलीस उपायुक्त), सायरस इराणी (सहा. पोलीस आयुक्त), विठ्ठल कुबडे(सहा. पोलीस आयुक्त)
अग्निशमन अधिकारी हरिश्चंद्र गिरकर यांचा सन्मान
हरिश्चंद्र गिरकर (उप. मुख्य अग्निशमन अधिकारी), दामोदर वनगड (अग्निशमन अधिकारी), कांचन पाटील (ड्रायव्हर ऑपरेटर), काशीनाथ मिश्रा (अग्रगण्य फायरमन).
सुधारात्मक सेवा
अशोक करकर (अधीक्षक), गोविंद राठोड (अतिरिक्त अधीक्षक), राजेंद्र धनगर (हवालदार), सुनील लांडे (हवालदार), प्रल्हाद शिंदे (हवालदार). विजय परब (सुभेदार), राजू हेटे (हवालदार)
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक
राजीव जैन (पोलीस महानिरीक्षक), सुधीर हिरेमठ (पोलीस महानिरीक्षक), शीला साहिल (पोलीस अधीक्षक), मोहन दहीकर (पोलीस अधीक्षक), पुरुषोतम कराड (पोलीस अधीक्षक), किरण पाटील (अतिरिक्त पोलीस अधीक्षक), नीलम वाव्हळ (पोलीस उपअधीक्षक), अविनाश शिळीमकर (निरीक्षक-पीए), गजानन शेळके (पोलीस उपअधीक्षक), महेश तावडे(सहा. पोलीस आयुक्त), विजय माहुलकर (अतिरिक्त पोलीस अधीक्षक) समीर साळुंके (सहा. पोलीस आयुक्त), पराग पोटे (पोलीस उपअधीक्षक), दयानंद गावडे (पोलीस उपअधीक्षक), पुष्पलता दिघे (पोलीस उपअधीक्षक), सुनील शिंदे (निरीक्षक-पीएच), सुवर्णा शिंदे (निरीक्षक, पीए), अनंत माळी (पोलीस उपअधीक्षक), महेंद्र कोरे (निरीक्षक), पैलाश बाराभाई (निरीक्षक), विजय मोहिते (उपनिरीक्षक), भारत सावंत (इन्स्पेक्टर), नरेंद्र राऊत (सहा. उपनिरीक्षक), सतीश निंबाळकर(उपनिरीक्षक), अफजल पठाण (सहा. उपनिरीक्षक), प्रदीप सावंत (सहा. उपनिरीक्षक), सुभाष साळवी (उपनिरीक्षक), प्रमोद वाघमारे (निरीक्षक, पीए), विजयकुमार शिंदे (उपनिरीक्षक), विक्रम नवरखेडे (उपनिरीक्षक), विजय देवरे (उपनिरीक्षक), मनोज गुजर (उपनिरीक्षक), अजय सावंत (उपनिरीक्षक), गंगाधर घुमरे (उपनिरीक्षक), संजय शेलार (उपनिरीक्षक), महादेव खंडारे (निरीक्षक), राजकुमार टोळनुरे (उपनिरीक्षक), बाबासाहेब ढाकणे (उपनिरीक्षक), शिवदास फुटाणे (उपनिरीक्षक), सुरेश सोनवणे (उपनिरीक्षक).
अग्निशमन दलाच्या सांघिक भावनेचा सन्मान!
मुंबई अग्निशमन दलाने वेळोवेळी धाडसी कामगिरी केल्या आहेत. ‘हॉटेल ताज’वरील दहशतवादी हल्ल्यावेळी अडकलेल्या नागरिकांची सुटका असो वा इतर दुर्घटनांतील बचावकार्य, प्रत्येक घटनेत अग्निशमन दल सांघिक भावनेने संकटाशी सामना करते. त्याच धाडसी आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीची दखल सरकारकडून घेतली गेली. मला मिळालेला पुरस्कार हा अग्निशमन दलाच्या सांघिक भावनेचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया उपप्रमुख अग्निशमन अधिकारी हरिश्चंद्र गिरकर यांनी दिली.
























































