31 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पाचवीचा निकाल 23.90 तर आठवीचा 19.30 टक्के

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या  माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. इयत्ता पाचवीचा  निकाल 23.90 टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल 19.30 टक्के एवढा लागला आहे. इयत्ता पाचवीच्या 16 हजार 693 विद्यार्थ्यांना तर इयत्ता आठवीच्या 15 हजार 93 विद्यार्थ्यांना अशा एपूण 31 हजार 786 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  मिळणार आहे.

इयत्ता पाचवीसाठी 5 लाख 63 हजार 300 6 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 5 लाख 47 हजार 504 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 1  लाख 30 हजार 846 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीच्या 3 लाख 78 हजार 95 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 65 हजार 754 विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहिले.त्यातील 70 हजार 571 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले.