
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील इयत्ता 5 वीचे 536 आणि 8 वीचे 418 असे एपूण 954 विद्यार्थी चमकले आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दरमहा शिष्यवृत्ती मिळणार आहे.यावर्षीच्या परीक्षेत इयत्ता 5 वीतील रिद्धी मिश्रा – वाकोला पालिका हिंदी शाळेतील विद्यार्थिनीने 79.19 टक्के गुण मिळवून मुंबई महानगरपालिका शाळेमधून प्रथम क्रमांक मिळविला. तर रोशनी तिवारी – वाकोला पालिका हिंदी शाळेतील विद्यार्थिनी 77.85 टक्के गुण मिळवत दुसरा आणि श्वेता तिवारी – बंदरपाखाडी एमपीएस शाळा हिने 76.51 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच 8 वीच्या शेख सलीम – देवनार वसाहत शाळा या विद्यार्थ्याने 79.72 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर, अंश यादव – दिंडोशी वसाहत पालिका हिंदी शाळा याने 78 टक्के गुण मिळवत द्वितीय आणि स्वीटी पाढी – काजूपाडा पालिका हिंदी शाळा हिने 74 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.