
मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची सोमवारी 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मा. राज्य निवडणूक आयुक्त यांची पत्रकार परिषद #मतदान #निवडणूक #राज्य_निवडक_आयोग #आयोग #महाराष्ट्रराज्य #स्थानिक_स्वराज्य_संस्था #आयोग #महाराष्ट्र #महाराष्ट्रराज्य #SEC #SEC_Maharashtra #Elections #StateElectionCommission #Commission pic.twitter.com/V50MWiNpDU
— Maharashtra SEC (@MaharashtraSEC) December 15, 2025
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पुर्वी घ्या, असे निर्देश सरकारला दिले आहे. या निर्देशानंतर सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत.






























































