राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा 125 कोटी झाडे लावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यात आतापर्यंत 15 कोटी 30 लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली असून राष्ट्रीय, राज्य व जिल्हा मार्गाच्या दुतर्फा 125 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

राज्यात 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2019 या तीन महिन्यांच्या कालावधीत 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आखण्यात आला आहे. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीचा आढावा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांशी संवाद साधला. आतापर्यंत राज्यात 15 कोटी 30 लाख 41 हजार 211 वृक्ष लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी वन राज्यमंत्री परिणय फुके, विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.